बाल न्याय अधिनियम २०१५
प्रकरण १० :
संकीर्ण :
कलम ९० :
बालकाचे माता-पिता किंवा पालकांची हजेरी :
यथास्थिती, या अधिनियमातील तरतुदीनुसार, समिती किंवा मंडळासमक्ष बालकास हजर केल्यावर, जेव्हा जेव्हा समिती किंवा मंडळास आवश्यक वाटेल, तेव्हा ते बालकाच्या माता-पिता किंवा पालकांना कारवाईच्या वेळी हजर राहण्यास सांगतील.