बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ८६ :
१.(अपराधांचे वर्गीकरण आणि नियुक्त (अभिहित) न्यायालये :
१) या अधिनियमा अन्वये ज्या अपराधांना सात वर्षापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा आहे, असे सर्व अपराध दखलपात्र आणि अजामीनपात्र असतील.
२) या अधिनियमा अन्वये ज्या अपराधांना तीन वर्षापेक्षा जास्त पण सात वर्षापेक्षा कमी कारावासाच्या शिक्षेची तरतूद केली आहे ते अपराध अदखलपात्र आणि अजामीनपात्र असतील.
३) या अधिनियमा अन्वये ज्या अपराधांना तीन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या कारावासाची किंवा फक्त दंडाच्या शिक्षेची तरतूद केली आहे, असे अपराध अदखलपात्र आणि जामीनपात्र असतील.
४) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २) किंवा बाल अधिकार संरक्षण आयोग अधिनियम २००५ (२००६ चा ४) अथवा लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ (२०१२ चा ३२) यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी या अधिनियमाच्या अधीन अपराध बाल न्यायालयात विचारणीय असतील.)
—–
१. २०२१ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम २६ द्वारा कलम ८६ ऐवजी समाविष्ट केले.