JJ act 2015 कलम ८५ : विकलांग बालकाविरुद्ध केलेले अपराध :

बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ८५ :
विकलांग बालकाविरुद्ध केलेले अपराध :
या प्रकरणात नमूद केलेला कोणताही अपराध कोणीही, ज्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विकलांग म्हणून घोषित केलेले आहे, अशा बालकाविरुद्ध केल्यास दोषी व्यक्तीस सदर अपराधासाठी दिलेल्या शिक्षेच्या दुप्पट शिक्षा दिली जाईल.
स्पष्टीकरण :
या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी, विकलांगता या संज्ञेचा अर्थ, विकलांगता असलेल्या व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग) अधिनियम १९९५ (१९९६ चा १) च्या कलम २ च्या खंड (झ) प्रमाणेच आहे.

Leave a Reply