बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ८२ :
शारीरिक शिक्षा :
१) बाल संगोपन केन्द्राचा प्रभारी असलेली किंवा सदर केन्द्रात काम करणारी व्यक्ती, जर बालाकाला शिस्त लावण्याच्या उद्देशाने बालकास शारीरिक इजा होईल अशी शिक्षा देईल तर ती व्यक्ती पहिल्या दोषसिद्धीसाठी दहा हजार रुपये दंडाच्या व त्यानंतरच्या प्रत्येक दोषसिद्धीला तीन महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या कालावधीच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाच्या किंवा दोन्ही शिक्षांना पात्र असेल.
२) जर कोणीही पोट-कलम (१) मध्ये उल्लेख केलेल्या संस्थेत नोकरी करणाऱ्या व्यक्तीस या उपकलमात दोषसिद्धी झाल्यास, तो सदर नोकरीतून बडतर्फीसही पात्र ठरेल आणि कोणत्याही बालकांशी प्रत्यक्ष संपर्क असणाऱ्या संस्थेत काम करण्यास अपात्र ठरेल.
३) जेव्हा पोट-कलम (१) मध्ये नमूद कोणत्याही संस्थेत शारीरिक शिक्षा देत असल्याची माहिती मिळाल्यास व तेथील व्यवस्थापनाने चौकशीत सहकार्य केले नाही किंवा समितीने किंवा मंडळाने किंवा न्यायालयाने किंवा राज्य शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन केले नाही तर सदर संस्थेचा प्रमुख व्यक्ती, किमान तीन वर्षे कारावासाच्या आणि एक लाख रुपयापर्यंतच्या दंडास पात्र ठरेल.