बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ७९ :
बाल कामगारांची पिळवणूक :
त्या त्यावेळी अमलात असलेल्या कोणत्याही अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी, जर कोणी बालकास नोकरीत ठेवील आणि वेठबिगारीत ठेवून त्याची मिळकतीची रक्कम स्वत:च्या ताब्यात स्वत:साठी ठेवून घेईल, त्याला पाच वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कालावधीची सश्रम कारावासाची आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकेल.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनाकरीता, नोकरीत या संज्ञेत, वस्तुंची विक्री करणे आणि आर्थिक फायद्यासाठी सार्वजनिक करमणुकीच्या जागी सेवा देणेही अंतर्भूत आहे.