बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ७८ :
बालकास गुंगीकारक मद्य, अंमली पदार्थ किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ विक्री, तस्करी, पुरवठा किंवा बाळगण्यासाठी वापरणाऱ्यास शिक्षा :
जो कोणी एखाद्या बालकाचा गुंगीकारक मद्य, अंमली पदार्थ किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ विक्री, तस्करी, पुरवठा किंवा बाळगण्यासाठी वापर करील त्याला सात वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कालावधीची सश्रम कारावासाची आणि एक लाख रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकेल.