JJ act 2015 कलम ७४ : बालकाचा तपशील उघड करण्यावर बंदी :

बाल न्याय अधिनियम २०१५
प्रकरण ९ :
बालकांविरुद्ध इतर अपराध :
कलम ७४ :
बालकाचा तपशील उघड करण्यावर बंदी :
१) कोणत्याही वृत्तपत्रात, मासिकात, वार्तापत्रात किंवा दृकश्राव्य माध्यमात किंवा प्रसारणाच्या कोणत्याही इतर माध्यमातून कोणतीही चौकशी, पोलीस तपास किंवा न्यायालयीन सुनावणीच्या वृत्तांत, बालकाचे नांव, पत्ता, शाळा किंवा कायद्याच्या विरोधात गेलेल्या किंवा ज्याला संगोपन आणि संरक्षणाची गरज आहे किंवा बळी पडलेला बालक आहे, अपराधाचा साक्षीदार आहे किंवा त्यावेळी प्रभावात असलेल्या कोणत्याही कायद्याच्या प्रकरणात संबंधित आहे अशा कोणत्याही बालकाची ओळख पटेल, असा तपशील प्रसिद्ध करता येणार नाही :
परंतु असे की, यथास्थिती, चौकशी करणारी समिती किंवा मंडळ, जर त्यांना असा तपशिल उघड करणे हे बालकाच्या कल्याणाचे आहे असे वाटत असल्यास, त्यासंबंधीची कारणे नमूद करुन असा तपशील उघड करण्यास परवानगी देऊ शकेल.
२) जी १.(प्रकरणे लंबित किंवा बंद करण्यात आलेली आहेत किंवा त्यांची निर्गंती) झालेली आहे, अशा कोणत्याही प्रकरणातील बालकाचा तपशील चरित्र प्रमाणपत्र देतांना पोलीस करणार नाहीत.
३) कोणत्याही व्यक्तीने पोटकलम (१) मधील तरतुदीचा भंग केल्यास त्या व्यक्तीस सहा महिन्यापर्यंत असू शकेल इत्यक्या कारावासाची किंवा रुपये दोन लाखपर्यंत असू शकेल इतक्या दंडाची किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतील.
——-
१. २०२१ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम २५ द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट केले

Leave a Reply