बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ७० :
प्राधिकरणाचे अधिकार :
१) त्यांची कर्तव्ये परिणामकारक रीतीने बजावण्यासाठी प्राधिकरणास निम्नलिखित अधिकार प्रदान केलेले आहेत, अर्थात् :-
क) कोणत्याही विशेष दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्थेस किंवा बालगृहास किंवा जेथे अनाथ, सोडून दिलेल्या किंवा ताब्यात दिलेल्या बालकांची निवासव्यवस्था केलेली आहे, अशा कोणत्याही बाल संगोपन गृहास किंवा राज्य संस्थेस किंवा कोणत्याही अधिकृत परदेशी दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्थेस सूचना देता येतील व सदर सूचनांची सदर संस्थेस अंमलबजावणी करावी लागेल;
ख) कोणत्याही अधिकारी किंवा कार्यकत्र्यावर किंवा त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील संस्था, या द्वारे जारी केलेल्या सुचनांचे सतत पालन न केल्यास त्यांच्यावर योग्य कारवाई करण्याची, संबंधित सरकार किंवा प्राधिकरणाला शिफारस करणे;
ग) कोणत्याही अधिकारी, कर्मचारी, संस्थांकडून दिलेल्या सूचनांची वारंवार पूर्तता न करण्याची प्रकरणे, अशा प्रकरणांची सुनावणी करण्याचे अधिकार असलेल्या न्यायाधीशांकडे पाठविणे. अशा पाठविलेल्या प्रकरणांची सदर न्यायाधीश फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) च्या ३४६ व्या कलमानुसार सुनावणी करतील;
घ) केन्द्र सरकार कडून दिले जाऊ शकतील असे इतर कोणतेही अधिकार.
२) प्रस्तावित दत्तक पालकांची पात्रता किंवा दत्तक जाणाऱ्या बालकाची योग्यता यासारख्या कोणत्याही बाबतीत दत्तक विधानाच्या (दत्तक ग्रहणाच्या) प्रकरणात मतभेद निर्माण झाल्यास, प्राधिकरणाचा निर्णय अंतिम असेल.