बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ६९ :
प्राधिकरणाची सुकाणू (संचालन) समिती :
१) प्राधिकरणाच्या सुकाणू (संचालन) समितीत निम्नलिखित सभासद असतील,-
क) सचिव, महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार हे मानद (पदेन) अध्यक्ष असतील;
ख) प्राधिकरणाशी संबंधित सह सचिव, महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार – मानद (पदेन) नेमणूक;
ग) सह सचिव, महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार, आर्थिक व्यवहाराबाबत मानद (पदेन) नेमणूक;
घ) एक राज्य दत्तकविधान (दत्तक ग्रहण) सहायता संस्था आणि दोन विशेष दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्था;
ङ) एक दत्तक घेणारे पालक आणि एक दत्तक;
च) एक वकील किंवा कौटुंबिक कायद्याचा किमान १० वर्षाचा अनुभव असलेले प्राध्यापक;
छ) सभासद सचिव, जे संघटनेचे मुख्य कार्यकारी ही असतील;
२) वरील १.(पोटकलम (१) च्या खंड (घ) ते (च)) मधील सदस्यांचे नामांकन किंवा निवड, त्यांचा कार्यकाल व त्यांच्या अटी व तरतुदी ठरवून दिल्याप्रमाणे असतील
३) सदर सुकाणू (संचालन) समितीची कर्तव्ये खालीलप्रमणे असतील, अर्थात :-
क) प्राधिकरणाच्या कामकाजावर देखरेख करणे आणि त्यांचे कामकाज परिणामकारक व्हावे म्हणून वेळोवेळी त्यांच्या कामकाजाचे पुनर्विलोकन करणे;
ख) प्राधिकरणाच्या वार्षिक अंदाजपत्रकास, वार्षिक ताळेबंदास व वार्षिक हिशोब तपासणीस तसेच कृती आराखड्यास व वार्षिक अहवालास मान्यता देणे;
ग) केन्द्रीय सरकारच्या मंजुरीने भरतीचे नियम, सेवा नियम, आर्थिक नियम ठरविणे, त्याचप्रमाणे प्राधिकरणातील प्रशासकीय आणि योजनात्मक अधिकार याबाबत नियंत्रण ठेवणे;
घ) केन्द्र सरकारकडून वेळोवेळी सोपविली जाणारी इतर अतिरिक्त कर्तव्ये बजावणे;
४) सदर सुकाणु (संचालन) समितीची महिन्यातून एकदा सभा ठरवून दिलेल्या नियमांनुसार होईल.
५) प्राधिकरण त्यांच्या मुख्यालयातून आणि कामकाजाच्या गरजांनुसार निर्माण केलेल्या त्यांच्या प्रादेशिक कार्यालयातून कर्तव्य बजावतील.
——–
१. २०१८ चा अधिनियम क्रमांक ४ याच्या कलम ३ आणि अनुसूची द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट केले.