JJ act 2015 कलम ६८ : केंद्रीय दत्तकविधान (दत्तक ग्रहण) सहायता संस्था :

बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ६८ :
केंद्रीय दत्तकविधान (दत्तक ग्रहण) सहायता संस्था :
हा अधिनियम अमलात येण्यापूर्वी अस्तित्वात असलेली केंद्रीय दत्तकविधान (दत्तक ग्रहण) सहायता संस्था, या अधिनियमातील तरतुदीनुसार केन्द्रीय दत्तकविधान (दत्तक ग्रहण) सहायता संस्था असल्याचे मानले जाईल व सदर संस्थेकडून खालील नमूद कर्तव्ये बजावली जातील, अर्थात् :-
क) देशांतर्गत दत्तकविधानांना (दत्तक ग्रहणांना) प्रोत्साहन देणे आणि राज्य संस्थेच्या समन्वयाने आंतरराज्य दत्तकविधानांना (दत्तक ग्रहणांना) सहाय्य करणे;
ख) आंतरदेशीय दत्तकविधानांवर (दत्तक ग्रहणांवर) नियंत्रण ठेवणे;
ग) आवश्यकतेनुसार, वेळोवेळी दत्तकविधाने (दत्तक ग्रहणे) व त्यासंबंधी कारवाईसंदर्भात नियमावली तयार करणे;
घ) बाल संरक्षणासंदर्भात हेग परिषदेत संमत झालेली केंद्रीय संस्थेची सर्व कर्तव्ये पूर्ण करणे आणि आंतरराष्ट्रीय दत्तकविधानांना (दत्तक ग्रहणांना) सहाय्य करणे;
ङ) विहित केलेली इतर सर्व कर्तव्ये बजावणे.

Leave a Reply