बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ६७ :
राज्य दत्तकविधान (दत्तक ग्रहण) सहाय्य संस्था :
१) दत्तकविधान (दत्तक ग्रहण) व त्यासंबंधी सर्व कारवाईत सहाय्य करण्यासाठी राज्य सरकार प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली राज्य दत्तकविधान (दत्तक ग्रहण) सहाय्य संस्था निर्माण करील.
२) जेथे अशी राज्यसंस्था यापूर्वीच अस्तित्वात असेल, ती या अधिनियमातील तरतुदीनुसार स्थापन झालेली आहे असे मानले जाईल.