JJ act 2015 कलम ६६ : दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्था म्हणून नोंदणीकृत नसलेल्या संस्थेतून बालकास दत्तक घेणे :

बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ६६ :
दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्था म्हणून नोंदणीकृत नसलेल्या संस्थेतून बालकास दत्तक घेणे :
१) या अधिनियमान्वये नोंदणी करण्यात आलेल्या सर्व संस्था, विशेष दत्तक (ग्रहण) संस्था म्हणून मान्यताप्राप्त नसल्या तरी, त्यांच्या संगोपनात असलेल्या सर्व अनाथ, सोडून दिलेल्या किंवा ताब्यात दिलेल्या बालकांना समितीकडून या अधिनियमातील कलम ३८ च्या तरतुदीनुसार दत्तकविधानास (दत्तक ग्रहण) योग्य म्हणून जाहीर करुन घेतले जाईल, याची खात्री करतील.
२) पोटकलम (१) मध्ये नमुद केलेल्या सर्व संस्था नजीकच्या विशेष दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्थेसोबत औपचारिक संबंध प्रस्थापित
करतील व त्यांच्याकडील कायद्याने दत्तकविधानास (दत्तक ग्रहणास) योग्य असलेल्या सर्व बालकंचा तपशील आवश्यक अभिलेखासह, सदर बालकांना दत्तक दिले जावे, अशा उद्देशाने ठरवून दिलेल्या पद्धतीने त्या विशेष दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्थेस पुरवतील.
३) जर कोणत्याही संस्थेने पोट-कलम (१) किंवा (२) च्या तरतुदींचा भंग केल्यास त्या संस्थेला रजिस्ट्रीकृत प्राधिकारीद्वारा प्रत्येक प्रकरणात रुपये पन्नास हजारपर्यंत दंडाची शिक्षा दिली जाऊ शकेल व सदर भंगाची निरंतर पुनरावृत्ती झाल्यास सदर संस्थेची नोंदणी रद्द होऊ शकेल.

Leave a Reply