बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ६३ :
दत्तकविधानाचे (दत्तक ग्रहणाचे) परिणाम :
ज्या बालकाच्या संदर्भात १.(जिल्हा दंडाधिकाऱ्याने) दत्तकविधानाचा आदेश दिलेला आहे, ते बालक दत्तक दिलेल्या माता-पित्यांनी दिलेला असल्याप्रमाणे, दत्तकविधानाच्या दिनांकापासून वारसा अधिकारासह सर्व बाबतीत दत्तक दिलेल्या मातापित्यांचे होईल आणि त्याच्या जन्मदात्या माता-पित्याबरोबरचे सर्व संबंध संपुष्टात येतील :
परंतु असे की, दत्तकविधानाचा (दत्तक ग्रहणाचा) आदेश होण्याच्या वेळेपूर्वी दत्तक घेतलेल्या बालकाच्या नावे केलेली मालमत्ता, त्या मालमत्तेवर मालकी हक्कासंबंधात काही जबाबदाऱ्या असल्यास, जन्मदात्या कुटूंबातील नातेवाईकांच्या सांभाळासारख्या त्या जबाबदाऱ्यांसह त्या बालकाच्या नावावरच राहील.
——–
१. २०२१ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम २२ द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट केले.