बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ६१ :
१.(दत्तक ग्रहणक प्रक्रिया (कार्यवाही) निकाली काढण्याची प्रक्रिया) :
१) दत्तका ग्रहणाबाबत आदेशा देण्यापूर्वी १.(जिल्हा दंडाधिकारी) खालील बाबतीत खात्री करुन घेईल,-
क) सदर दत्तकविधान (दत्तक ग्रहण) बालकाच्या कल्याणासाठी आहे;
ख) बालकाचे वय विचारात घेऊन, बालकाच्या इच्छा देखील विचारात घेतल्या गेल्या आहेत; आणि
ग) दत्तक घेणाऱ्या, माता-पिता यांना किंवा यांच्याकडून किंवा विशेष दत्तकविधान संस्था किंवा बालकाचे जन्मदाते माता-पिता किंवा पालक यांना किंवा यांच्याकडून दत्तक नियंत्रण संस्थेच्या नियमावली व्यतिरिक्त इतर कोणताही आर्थिक लाभ किंवा लाभाचे आश्वासन किंवा दत्तकविधानाचा मोबदला किंवा दत्तकविधानाच खर्च किंवा आर्थिक सेवालाभ किंवा बालकाचा मोबदला किंवा बालकाचा संगोपनखर्च दिला किंवा घेतला गेला नाही.
२) दत्तकविधानाची (दत्तक ग्रहणाची) सर्व कारवाई बंद खोलीत (इन कॅमेरा) होईल आणि २.(जिला मजिस्ट्रेट) न्यायालय अर्ज दाखल झाल्यापासून दोन महिन्यांत प्रकरणाची निर्गंती करील (निकालात काढील).
——–
१. २०२१ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम २१ द्वारा मूळ शीर्ष ऐवजी समाविष्ट केले.
२. २०२१ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम २१ द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट केले.