बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ५८ :
भारतात राहणाऱ्या आणि बालकास दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या माता-पित्यांसाठी दत्तका ग्रहणाची (दत्तकविधानाची) कार्यपद्धती :
१) भारतात राहणाऱ्या, बालकस दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही धर्माच्या भारतीय मातापित्यांस जर अनाथ, सोडून
दिलेले किंवा ताब्यात दिलेले बालक दत्तक घ्यावयाचे असल्यास, त्यांनी विशेष दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्थेकडे दत्तकविधान (दत्तक ग्रहण) नियंत्रण नियमावलीनुसार विनंती अर्ज सादर करावा.
२) विशेष दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्था, बालकास दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या माता-पित्यांचा गृह निरीक्षण अहवाल तयार करील व
दत्तक घेण्यास लायक आढळल्यास, दत्तक जाण्यास योग्य ठरविलेल्या बालकाचा, बालक निरीक्षक अहवाल व वैद्यकीय अहवाल
दत्तकविधान (दत्तक ग्रहण) नियंत्रण नियमावलीनुसार विचारात घेतील.
३) बालकास दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या माता-पित्यांनी दत्तक घ्यावयाचे बालक, त्या बालकाचा बालक निरीक्षण अहवाल आणि वैद्यकीय अहवालास स्वीकृती दिल्यावर, सदर दत्तकविधान संस्था सदर बालकास सदर प्रस्तावित माता-पित्यांकडे दत्तकपूर्वक उसन्या पालकत्वात सोपवील व १.(जिल्हा दंडाधिकाऱ्या समक्ष) दत्तकविधान (दत्तक ग्रहण) मंजुरी आदेशासाठी दत्तकविधान (दत्तक ग्रहण) नियंत्रण नियमावलीनुसार अर्ज सादर करील.
४) २.(जिल्हा दंडाधिकाऱ्या द्वारा पारित केलेल्या आदेशाची) प्रमाणित प्रत प्राप्त झाल्यावर, विशेष दत्तकविधान नियंत्रण संस्था सदर प्रत प्रस्तावित माता-पित्यांकडे पाठवील.
५) दत्तक ग्रहण नियंत्रण नियमावलीतील नमूद केल्याप्रमाणे दत्तक बालकाचे, दत्तक घरातील कल्याण आणि प्रगती यांचा पाठपुरावा केला जाईल.
——-
१. २०२१ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम १८ द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट केले.
२. २०२१ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम १८ द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट केले.