बाल न्याय अधिनियम २०१५
प्रकरण ८ :
दत्तकविधान (दत्तक ग्रहण) :
कलम ५६ :
दत्तक ग्रहण :
१) अनाथ, सोडून दिलेल्या किंवा जमा केलेल्या बालकंचा कुटूंबाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी हा अधिनियम व त्याखाली तयार करण्यात आलेल्या नियमावलीच्या आणि दत्तकविधान नियंत्रण नियमाच्या अधीन राहून दत्तकविधानाची (दत्तक ग्रहणाची) कारवाई होईल.
२) कोणत्याही धर्माच्या एका व्यक्तीचे मूल दुसऱ्या नातेवाईकांनी दत्तक घेण्याची कारवाई, या अधिनियमातील तरतूदी आणि दत्तकविधान (दत्तक ग्रहण) नियंत्रण नियमावलीनुसार होईल.
(३) या अधिनियमातील तरतुदी, qहदी दत्तक आणि निर्वाह अधिनियम, १९५६ अन्वये झालेल्या बालकांच्या दत्तकविधानास (दत्तक ग्रहणास) लागू होणार नाहीत.
(४) देशांतर्गत झालेल्या सर्व दत्तकविधानास (दत्तक ग्रहणास) या अधिनियमातील तरतुदी आणि दत्तकविधान (दत्तक ग्रहण) नियंत्रण नियमावली लागू होईल.
(५) कोणतीही व्यक्ती जी, १.(जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या) आवश्यक आदेशाशिवाय, परदेशातून बालकास आणते किंवा बालकास परदेशात
पाठविते किंवा परदेशातील व्यक्तीकडे बालकाचे संगोपन व ताबा सोपविण्याच्या प्रक्रियेत सहभागी होते ती व्यक्ती या अधिनियमाच्या कलम ८० अन्वये शिक्षेस पात्र ठरेल.
——-
१. २०२१ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम १७ द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट केले.