बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ५२ :
सुयोग्य व्यक्ती :
१) एखाद्या व्यक्तीच्या पात्रतेबाबत आवश्यक त्या चौकशीनंतर सदर व्यक्ती तात्पुरत्या स्वरुपात बालकाच्या संगोपन, संरक्षण आणि उपचारासाठी ठराविक कालावधीसाठी स्वीकारण्यास सुयोग्य असल्याबाबत मंडळ किंवा समिती ठरवून दिलेल्या पद्धतीने मान्यता देतील.
२) यथास्थिती, एखाद्या व्यक्तीस पोट-कलम (१) अन्वये दिलेली मान्यता, त्यासाठीची कारणे लेखी स्वरुपात नोंदवून मंडळ किंवा समिती रद्द करु शकेल.