बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ५१ :
योग्य सुविधा यंत्रणा (योग्य ठिकाण) :
१) शासकीय किंवा स्वयंसेवी, अशासकीय सेवाभावी संघटनेमार्फत त्यावेळी अमलात असणाऱ्या कोणत्याही अधिनियमाद्वारे नोंदणीकृत आस्थापना तात्पुरत्या स्वरुपात बालकाची ठरवून दिलेल्या पद्धतीने जबाबदारी घेण्यास योग्य असल्याबाबत, आवश्यक त्या चौकशीनंतर मंडळ किंवा समिती ठरवील.
२) एखाद्या आस्थापनेस, पोट-कलम (१) अन्वये दिलेली मान्यता, त्यासाठीची कारणे लेखी स्वरुपात नोंदवून मंडळ किंवा समिती रद्द करु शकेल.