बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ४९ :
सुरक्षा गृह :
१) राज्य सरकार, प्रत्येक राज्यात या अधिनियमातील कलम ४१ अन्वये, १८ वर्षावरील व्यक्ती किंवा १६ ते १८ वर्षे वयाच्या दरम्यान असलेल्या कायद्याचे उल्लंघन केलेल्या आणि निर्घृण स्वरुपाचा अपराधाचा आरोप किंवा दोषसिद्धी असलेल्या बालकासाठी किमान एक सुरक्षागृह स्थापन करील.
२) चौकशी सुरु असलेल्या अशा व्यक्ती किंवा बालके आणि अशा आरोपासाठी दोषसिद्धी असलेल्या व्यक्ती किंवा बालकांच्या वास्तव्यासाठी व्यवस्था असेल.
३) राज्य सरकार, नियमा द्वारे पोटकलम (१) मधील सुरक्षा गृह कसे असावे आणि तेथे कोणत्या सेवा आणि सुविधा उपलब्ध असतील हे विहित करु शकेल.