JJ act 2015 कलम ४३ : मुक्त आश्रयस्थान :

बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ४३ :
मुक्त आश्रयस्थान :
१) राज्य सरकार, आवश्यकतेनुसार स्वत: किंवा स्वयंसेवी आणि सेवाभावी अशासकीय संस्थामार्फत आवश्यक तेवढी मुक्त आश्रयस्थाने निर्माण करील आणि सदर मुक्त आश्रयस्थानांची नोंदणी विहित केल्याप्रमाणे केली जाईल.
२) पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेली मुक्त आश्रयस्थाने निवाऱ्याची आवश्यकता असलेल्या बालकांसाठी सामाजिक संस्थेप्रमाणे बालकांचे गैरव्यवहारांपासून संरक्षण करणे आणि त्यांना आश्रय देणे किंवा रस्त्यावरील आयुष्यापासून दूर ठेवणे, या उद्देशाने तात्पुरत्या स्वरुपात कार्य करतील.
३) सदर मुक्त आश्रयस्थाने, विहित केलेल्या पद्धतीने, जिल्हा बाल संरक्षण केन्द्राला आणि बाल कल्याण समितीला, किती बालकांनी सदर सेवेचा लाभ घेतला याबाबत मासिक अहवाल सादर करतील.

Leave a Reply