बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ४० :
देखभाल आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या बालकाची पुन:स्थापना :
१) बालकाची सामाजिक पुन:स्थापना हे प्रत्येक बाल सुधारगृह, विशेष दत्तक संस्था किंवा मुक्त आश्रयस्थानाचे मुख्य उद्दिष्ट असेल.
२) यथास्थिती, सर्व बालगृह, विशेष दत्तक संस्था, मुळ आश्रयस्थान, कौटुंबिक वातावरणास वंचित झालेल्या बालकास तात्पुरते किंवा दीर्घकाळासाठी कौटूंबिक वातावरणात ठेवण्याचा प्रयत्न करतील.
३) देखभाल आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या बालकास, त्याचे मातापिता, पालक किंवा योग्य व्यक्ती यांच्या योग्यतेची खात्री केल्यानंतर त्यांच्या ताब्यात बालकास सोपविण्याचे आणि त्यांना आवश्यक सूचना देण्याचे अधिकार समितीस आहेत.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनासाठी, बालकाचे पुर्नस्थापन आणि संरक्षण म्हणजे, सदर बालकास,-
क) मातापिता;
ख) दत्तक मातापिता;
ग) पोषक (उसने) मातापिता;
घ) पालक; या
ङ) सुयोग्य व्यक्ति,
यांच्या जवळ सोपविणे.
१.(४) समिती, विहित केलेल्या पद्धतीने राज्य सरकार आणि जिल्हा दंडाधिकारी यांना मायदेशी परत येणे, मृत्यु आणि फरार होण्याबाबतचा त्रैमासिक अहवाल सादर करील.)
——-
१. २०२१ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम १३ द्वारा समाविष्ट करण्यात आले.