JJ act 2015 कलम ३९ : पुनर्वसन आणि सामाजिक पुर्नएकात्मीकरणाची कार्यपद्धती :

बाल न्याय अधिनियम २०१५
प्रकरण ७ :
पुनर्वसन आणि सामाजिक पुर्नएकात्मीकरण :
कलम ३९ :
पुनर्वसन आणि सामाजिक पुर्नएकात्मीकरणाची कार्यपद्धती :
१) प्रत्येक बालकाच्या व्यक्तीगत संगोपन योजनेनुसार सदर बालकाच्या पुनर्वसन आणि सामाजिक पुर्नएकात्मीकरणाचे काम या अधिनियमान्वये केले जाईल, सदर पुनर्वसन आणि सामाजिक पुर्नएकात्मीकरण काम आवश्यकतेनुसार देखरेखीखाली किंवा देखरेखीशिवाय कुटूंबात किंवा पालकांच्या ताब्यात देऊन किंवा संगोपनगृहात किंवा दत्तक देऊन करण्याचा प्रयत्न केला जाईल :
परंतु असे की, असे प्रयत्न करताना भावंडांना दूर ठेवणे त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने योग्य असल्याच्या परिस्थितीशिवाय अन्यथा संगोपनगृहात किंवा संस्थेत एकत्र ठेवून करण्याचा प्रयत्न केला जाईल.
२) कायद्याचे उल्लंघन केलेल्या बालकांच्या बाबतीत पुनर्वसन आणि सामाजिक पुर्नएकात्मीकरणाचे काम निरीक्षणगृहात केले जाईल, जर सदर बालकास जामिनावर मुक्त केले न गेल्यास किंवा विशेष संस्थेत किंवा योग्य संस्थेत किंवा योग्य व्यक्तीच्या ताब्यात या आदेशानुसार सदर प्रयत्न केले जातील.
३) देखभाल आणि संरक्षणाची आवश्यकता असलेले बालकास कोणत्याही कारणाने कुटूंबात ठेवलेले नसल्यास, या अधिनियमान्वये नोंदणीकृत संस्थेत किंवा योग्य व्यक्ती किंवा योग्य संस्थेत तात्पुरते किंवा दीर्घ काळासाठी ठेवले जाईल व अशा ठिकाणी त्या बालकाच्या पुनर्वसन आणि सामाजिक पुर्नएकात्मीकरणाचे प्रयत्न केले जातील.
४) देखभाल आणि संरक्षणाची आवश्यकता असलेले बालक जेव्हा, वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्याने काळजीवाहू संस्था सोडत असेल किंवा कायद्याचे उल्लंघन केलेले बालक विशेष गृह किंवा सुरक्षेचे ठिकाण सोडत असेल तेव्हा त्या बालकास कलम ४६ मध्ये नमूद केल्याप्रमाणे समाजाच्या मूळ प्रवाहात सामील होण्यासाठी सहाय्यक होईल आर्थिक स्थैर्य दिले जाईल.

Leave a Reply