JJ act 2015 कलम ३८ : सदर बालक कायदेशिरपणे दत्तक जाण्यासाठी योग्य असल्याचे जाहीर करणे :

बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ३८ :
सदर बालक कायदेशिरपणे दत्तक जाण्यासाठी योग्य असल्याचे जाहीर करणे :
१) अनाथ आणि सोडून दिलेल्या बालकाच्या बाबतीत समिती सदर बालकाचे माता पिता किंवा पालक यांना शोधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल आणि चौकशीअंती जर सदर बालक अनाथ असल्याचे किंवा सोडून दिलेले असल्याचे निष्पन्न झाल्यास, सदर बालक कायदेशिररीत्या दत्तक जाण्यास योग्य असल्याचे जाहीर करेल :
परंतु असे की, हजर केलेले बालक दोन वर्षापर्यंत वयाचे असल्यास, जाहीर करण्याचा कालावधी दोन महिन्यांपर्यंत असेल आणि दोन वर्षापेक्षा जास्त वयाच्या बालकांच्या बाबतीत सदर कालावधी चार महिन्यांचा असेल :
परंतु आणखी असे की, या संदर्भात त्या त्यावेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी, सोडून दिलेल्या बालकांच्या या अधिनियमाखालील चौकशीच्या दरम्यान बालकाच्या जन्मदात्या मातापित्यांविरुद्ध कोणतीही प्रथम खबर दाखल केली जाणार नाही.
२) समिती समोर मातापिता किंवा पालकांनी आणून दिलेल्या बालकांच्या संदर्भात समितीने बालकास ज्या संस्थेत ठेवले असेल, त्या संस्थेकडून कलम ३५ मध्ये नमूद केलेला कालावधी समाप्त होताच सदर प्रकरण, बालकास कायदेशीरपणे दत्तक जाण्यास योग्य जाहीर करण्यासाठी समितीसमोर सादर केले जाईल.
३) त्या त्यावेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी, मतीमंद मातापित्यांचे बालक किंवा लैंगिक अत्याचारातून जन्मलेले नको असलेले बालक, या अधिनियमात नमूद केलेल्या पद्धतीने दत्तक जाण्यास योग्य असल्याचे जाहीर केले जाईल.
४) अनाथ, सोडून दिलेले किंवा हजर केलेले बालक कायदेशीररीत्या दत्तक जाण्यास योग्य असल्याचा निर्णय समितीमधील किमान तीन सदस्य घेतील.
५) समिती १.(जिल्हा दंडाधिकारी), राज्य पातळीवरील अधिकाऱ्यांना आणि विभागाला किती बालकांना कायदेशीररीतय दत्तक जाण्यास योग्य असल्याचे जाहीर केले गेले आहे आणि किसी प्रकरणे प्रलंबित आहेत, त्याबाबत मासिक अहवाल सादर करेल.
——–
१. २०२१ चा अधिनियम क्रमांक २३ च्या कलम १२ द्वारा समाविष्ट केले.

Leave a Reply