JJ act 2015 कलम ३७ : देखभाल आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या बालकाबाबत आदेश :

बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ३७ :
देखभाल आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या बालकाबाबत आदेश :
१) चौकशीअंती समितीसमोर आलेले बालक देखभाल आणि संरक्षणाची गरज असलेले बालक असल्याबाबत समितीचे समाधान झाल्यास, १.(***) सामाजिक चौकशीचा अहवाल आणि सदर बालक पुरेसे विचारक्षम असल्यास बालकाची इच्छा विचारात घेऊन खालीलपैकी एक किंवा अधिक आदेश देतील, अर्थात् :-
क) बालकास देखभाल आणि संरक्षणाची आवश्यकता असल्याचे जाहीर करणे;
ख) बाल कल्याण अधिकाऱ्यांच्या किंवा नेमणूक केलेल्या समाजसेवकाच्या देखरेखीखाली किंवा देखरेखीशिवाय बालकास माता पिता किंवा पालकांच्या ताब्यात पुन्हा सोपविणे;
ग) बालकास बालगृहात किंवा योग्य संस्थेमध्ये किंवा सदर संस्थेची सदस्य संख्या मर्यादा विचारात घेऊन आणि सदर बालकाच्या कुटूंबाचा शोध लागण्याची शक्यता नसल्याचा किंवा शोध लागला तरी त्या कुटूंबात बालकाचे पुनर्वसन बालकासाठी योग्य नसल्यास निर्णय झाल्यास विशेष दत्तक संस्थेत दीर्घ कालावधीसाठी किंवा तात्पुरत्या सुरक्षेसाठी व देखभालीसाठी ठेवणे;
घ) सदर बालकास दीर्घ कालावधीसाठी किंवा काही काळासाठी योग्य व्यक्तीच्या अभिरक्षेत ठेवणे;
ङ) कलम ४४ अन्वये संगोपण गृहात ठेवणे;
च) कलम ४५ अन्वये प्रायोजकत्वाबाबत आदेश;
छ) ज्यांच्या देखभालीत असे बालक ठेवले आहे अशा व्यक्ती किंवा संस्थेस सदर बालकाची काळजी, देखभाल, संरक्षण आणि पुनर्वसन तसेच बालकास तातडीने आवश्यक असलेला निवारा, वैद्यकीय सुविधा, मानसोपचार आणि गरजेचे समुपदेशन, व्यावसायिक उपचार, वर्तन सुधारणात्मक उपचार, व्यावसायिक कौशल्य, कायदेविषयक सहाय्य, शैक्षणिक सुविधा आणि जिल्हा बाल सुरक्षा केन्द्राच्या, राज्य सरकारच्या आणि इतर संस्थांच्या समन्वयातून इतर विकासात्मक आवश्यक कारवाई व पाठपुरावा याबाबत आदेश;
ज) कलम ३९ अन्वये दत्तक घेण्यासाठी कायदेशीररित्या बालक मुक्त घोषित करणे.
२) बाल कल्याण समिती खालील संदर्भात आदेश देऊ शकेल –
एक) बालक सुरक्षा संगोपनासाठी योग्य व्यक्ती;
दोन) कलम ४६ अन्वये संगोपनोत्तर आधार देण्याबाबत; किंवा
तीन) इतर काही बाबतीत आवश्यकता असल्यास आदेश.
——-
१. २०२१ चा अधिनियम क्रमांक २३ च्या कलम ११ द्वारा बाल कल्याण अधिकाऱ्यानंी सादर केलेला शब्द वगळण्यात आले.

Leave a Reply