बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ३५ :
बालकास सोपविणे :
१) मातापिता किंवा पालक यांना त्यांच्या नियंत्रणापलीकडील शारीरिक, भावनिक किंवा सामाजिक कारणांमुळे, बालकाला सोपवावयाचे असेल तर ते त्या बालकास समिती समक्ष हजर करतील.
२) ठरवून दिलेल्या चौकशी आणि समुपदेशाच्या कारवाईनंतर, समितीचे समाधना झाल्यावर, यथास्थिति, बालकाच्या सोपवणूकीची कागदपत्रे तयार करुन मातापिता किंवा पालक समितीसमोर सादर करतील.
३) बालकास सोपविणारे मातापिता किंवा पालक यांना त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला जाईल, दरम्यानच्या कालावधीत, आवश्यक त्या चौकशीनंतर समितीला योग्य वाटल्यास ते त्या बालकास त्याचे मातापिता किंवा पालक यांच्यासोबत देखरेखीखाली राहण्यास परवानगी देतील किंवा बालक सहा वर्षापेक्षा कमी वयाचे असल्यास विशेष दत्तक संस्थेकडे सोपवतील किंवा बालक सहा वर्षापेक्षा जास्त वयाचे असल्यास बाल सुधार गृहात ठेवतील.