बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ३२ :
पालकांपासून विभक्त झालेले बालक आढळल्यास माहिती देने बंधनकारक :
१) कोणत्याही व्यक्तीस किंवा पोलीस अधिकाऱ्यास किंवा कोणत्याही संघटनेत किंवा रुग्णालयात किंवा प्रसूतीगृहात काम करणाऱ्या व्यक्तीस जे बालक हरवले आहे किंवा सोडून दिले आहे किंवा अनाथ असल्याचे दिसते आहे असे बालक आढळल्यास किंवा माहिती मिळाल्यास किंवा सापडल्यास किंवा अशा बालकाचा ताबा मिळाल्यास, कौटुंबिक आधार नसलेल्या त्या बालकाबाबतची माहिती (प्रवासासाठी लागणारा कालावधी वगळून २४ तासांच्या आत) बाल सुरक्षा संस्था किंवा नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा बाल कल्याण समितीला किंवा जिल्हा बाल सुरक्षा केन्द्रात देतील किंवा सदर बालकास, या अधिनियमान्वये नोंदणी झालेल्या बाल संगोपन केन्द्रात पोहोचवतील.
१.(२) पोटकलम (२) मध्ये नमूद केलेल्या बालकाशी संबंधित माहिती, यथास्थिती, समिती किंवा जिल्हा बाल सुरक्षा केन्द्र किंवा बाल संगोपन सस्थे द्वारा केन्द्र सरकाने ठरवून दिलेल्या पोर्टलवर नोंदवीली जाईल (अपलोड केली जाईल).
——–
१. २०२१ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम १० अन्वये पोटकलम (२) ऐवजी समाविष्ट केले.