बाल न्याय अधिनियम २०१५
प्रकरण ६ :
देखभाल आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या बालका संबंधात प्रक्रिया :
कलम ३१ :
समिती समक्ष हजर करणे :
१) ज्या बालकाचा देखभाल आणि संरक्षणाची गरज आहे, अशा बालकास खालीलपैकी कोणीही व्यक्ती बाल कल्याण समिती समक्ष हजर करु शकेल, अर्थात् :-
एक) कोणताही पोलीस अधिकारी किंवा विशेष बाल सुरक्षा पोलीस युनिट किंवा अधिकृत बाल कल्याण पोलीस अधिकारी किंवा जिल्हा बाल संरक्षण केन्द्राचा अधिकारी किंवा त्या त्यावेळी अमलात असलेल्या कामगार अधिनियमान्वये नेमणूक झालेला निरीक्षक दर्जाचा अधिकारी;
दोन) कोणताही लोकसेवक;
तीन) बाल संरक्षा सेवा किंवा कोणतीही अशासकीय स्वयंसेवी संस्था किंवा राज्य शासनानी नोंद घेतलेली कोणतीही संस्था;
चार) बाल कल्याण अधिकारी किंवा परिवीक्षा अधिकारी;
पाच) कोणीही सामाजिक कार्यकर्ता किंवा सार्वजनिक भावना युक्त नागरिक;
सहा) कोणतेही बालक स्वत:; किंवां
सात) कोणतीही नर्स, डॉक्टर, प्रसूतिगृह, रुग्णालय किंवा प्रसूतिगृहाचे व्यवस्थापन :
परन्तु सदर बालकास वेळ वाया न घालवता तसेच प्रवासास लागणारा कालावधी वगळून २४ तासांच्या आत समितीसमक्ष हजर केले पाहिजे.
२) राज्य सरकार, कोणत्या पद्धतीने समितीस अहवाल सादर केला जावा आणि चौकशीच्या कालावधीत, कोणत्या पद्धतीने बालकास बाल सुरक्षागृहात किंवा सुयोग्य संस्थेत किंवा सुयोग्य व्यक्तीकडे सोपविले जावे याबाबत, या अधिनियमातील तरतुदीशी सुसंगत असे नियम करु शकेल.