बाल न्याय अधिनियम २०१५
कलम २५ :
प्रलंबित प्रकरणांबाबत विशेष तरतूद :
या अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरीही, कायद्याचे उल्लंघन केल्याचा संशय असलेले किंवा कायद्याचे उल्लंघन करताना आढळलेले बालक याबाबत, हा अधिनियम अस्तित्वात आला त्यावेळी कोणत्याही मंडळासमोर किंवा न्यायालयासमोर प्रलंबित असलेले प्रकरण, हा अधिनियम अस्तित्वात आला नसता तर ज्याप्रमाणे हाताळले गेले असेल, तसेच हाताळले जाईल.