बाल न्याय अधिनियम २०१५
कलम २३ :
कायद्याचे उल्लंघन केलेले बालक आणि बालक नसलेल्या व्यक्तीविरुद्ध संयुक्त कार्यवाही करता येणार नाही :
१) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २) च्या कलम २२३ मध्ये किंवा त्या त्यावेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, कायद्याचे उल्लंघन केल्याचा संशय (आरोप) असलेला बालक आणि बालक नसलेल्या व्यक्तीविरुद्ध संयुक्त कार्यवाही करता येणार नाही.
२) जर मंडळा द्वारा किंवा बाल न्यायालय द्वारा चौकशी दरम्यान, कायद्याचे उल्लंघन केलेले बालक असल्याचा संशय असलेली व्यक्ती बालक नाही, असे निष्पन्न झाल्यास सदर व्यक्तीविरुद्ध एखाद्या बालकासोबत संयुक्तपणे कार्यवाही करता येणार नाही.