बाल न्याय अधिनियम २०१५
कलम २२ :
फौजदारी प्रक्रिया संहिता प्रकरण ८ अन्वये कार्यवाही बालकाविरुद्ध लागू होणार नाही :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २) किंवा त्या त्यावेळी अमलात असणाऱ्या कोणत्याही प्रतिबंधात्मक स्थानबद्धता अधिनियमात काहीही नमूद केलेले असले तरी, कोणत्याही बालकाविरुद्ध उक्त संहितेच्या प्रकरण ८ अन्वये कार्यवाही सुरु करता येणार नाही आणि कोणताही आदेश देता येणार नाही.