बाल न्याय अधिनियम २०१५
कलम २१ :
कायद्याचे उल्लंघन केलेल्या बालकाबाबत देता येणार नाही असा आदेश :
कायद्याचे उल्लंघन केलेल्या बालकाबाबत या अधिनियमान्वये किंवा भारतीय दंड संहिता किंवा त्या त्यावेळी अमलात असणाऱ्या कोणत्याही अधिनियमान्वये मृत्युदंड किंवा मुक्ततेची शक्यता नाही, अशा जन्मठेपेचा आदेश देता येणार नाही.