बाल न्याय अधिनियम २०१५
कलम १७ :
बालकाबाबत दिलेले आदेश कायद्याशी विसंगत नसतील :
१) मंडळासमक्ष हजर केलेल्या बालकाने अपराध केलेला नाही, याबाबत चौकशीअंती मंडळाचे समाधान झाल्यास, त्यात्यावेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यात याविरुद्ध काहीही असले तरी, मंडळ याबाबत आदेश पारित करेल.
२) जर पोटकलम (१) मध्ये उल्लेख केलेल्या बालकास देखरेख आणि संरक्षणाची गरज असल्याचे मंडळाचे मत झाल्यास, तर मंडळ त्यास, आवश्यक योग्य सूचनांसाठी समितीकडे पाठवील.