JJ act 2015 कलम ११ : कायद्याचे उल्लंघन केलेल्या बालकास ज्या व्यक्तीच्या ताब्यात सोपविले असेल, अशा व्यक्तीची भूमिका :

बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ११ :
कायद्याचे उल्लंघन केलेल्या बालकास ज्या व्यक्तीच्या ताब्यात सोपविले असेल, अशा व्यक्तीची भूमिका :
ज्याच्या ताब्यात कायद्याचे उल्लंघन केलेल्या बालकास सोपविले असेल, सदर आदेश कायम असेपर्यंत ते त्या बालकाचे माता पिता असल्याप्रमाणे सदर बालकाचे संगोपन ही त्या व्यक्तीची जबाबदारी असेल :
परंतु जर सदर बालकाचे मातापिता किंवा इतर कोणी व्यक्ती सदर बालकास सांभाळण्यास योग्य असल्याचे मंडळाचे मत असले तरी, जरी सदर बालकाच्या मातापित्यांनी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने सदर बालकाचा ताबा मागितला तरीही मंडळाने ठरवून दिलेल्या कालावधीपर्यंत ते बालक त्या व्यक्तीच्या जबाबदारीत असेल.

Leave a Reply