बाल न्याय अधिनियम २०१५
कलम १०९ :
अधिनियमाच्या अंमलबजावणीवर देखरेख :
१) कलम ३ अन्वये निर्माण करण्यात आलेल्या राष्ट्रीय बाल हक्क आयोग किंवा बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम, २००५ (२००६ चा ४) च्या कलम १७ मधील तरतुदींअन्वये निर्माण करण्यात आलेले राज्य पातळीवरील बाल हक्क संरक्षण आयोग (यापुढे त्यांना, यथास्थिती, राष्ट्रीय आयोग आणि राज्य आयोग असे संबोधले जाईल) त्यांना बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम, २००५ च्या तरतुदीनुसार नेमून दिलेल्या कर्तव्यांसह या अधिनियमातील तरतुदीच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवतील.
२) यथास्थिती, राष्ट्रीय आयोग किंवा राज्य आयोग या अधिनियमातील कोणत्याही अपराधाबाबत चौकशी करतानाचे बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम २००५ अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेले सर्व हक्कही अबाधित आहेत.
३) यथास्थिती, राष्ट्रीय आयोग किंवा राज्य आयोग त्यांच्या वार्षिक अहवालात या कलमासोबतच बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम, २००५ च्या कलम १६ अन्वये केलेल्या कारवाईचाही अंतर्भाव करतील.