JJ act 2015 कलम १०८ : अधिनियमाच्या तरतुदींबाबत जनजागृती :

बाल न्याय अधिनियम २०१५
कलम १०८ :
अधिनियमाच्या तरतुदींबाबत जनजागृती :
केंद्र सरकार व सर्व राज्य सरकार खालीलबाबत आवश्यक ते उपाय करतील,-
क) या अधिनियमातील तरतुदींबाबत दूरदर्शन, वृत्तपत्रे, आकाशवाणी सर्व प्रसारमाध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती अभियान चालवून सर्वसाधारण जनता, बालके, त्यांचे माता पिता आणि पालक यांना सदर तरतुदींबाबत जास्तीत जास्त माहिती देणे.
ख) केंद्र सरकारचे व राज्य सरकाचे सर्व अधिकारी आणि सर्व संबंधितांना या अधिनियमातील तरतुदींच्या अंमलबजावणीबाबत कालबद्ध प्रशिक्षण देणे.

Leave a Reply