बाल न्याय अधिनियम २०१५
कलम १०७ :
बाल कल्याण पोलीस अधिकारी आणि विशेष बाल पोलीस केन्द्र (युनिट / एकक) :
१) प्रत्येक पोलीस ठाण्यात, किमान साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा किमान एक अधिकारी योग्य प्रशिक्षण असलेला आणि जाणीव निर्माण करुन बाल कल्याण पोलीस अधिकारी म्हणून नेमला जाईल. सदर अधिकारी पीडित बालके, आणि कायद्याचे उल्लंघन केलेली बालके आणि पोलीस, स्वयंसेवी सेभाभावी अशासकीय संस्था यांच्यात समन्वय साधण्याचे काम करील.
२) बालकांच्या संबंधातील पोलीसांची सर्व कर्तव्ये यात समन्वय ठेवण्यासाठी राज्य सरकार प्रत्येक जिल्हा व शहरासाठी एक बाल सहाय्य पोलीस केंद्र स्थापित करील व त्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उप अधिक्षक दर्जापेक्षा कमी नसलेले अधिकारी असतील. या केंद्रातील सर्व पोलीस अधिकारी पोटकलम (१) अन्वये नामनिर्देशित असतील आणि बाल कल्याणाच्या क्षेत्रात कामाचा अनुभव असलेले दोन समाजसेवक व त्यातील किमान एक महिला असेल.
३) पोलीस बाल न्याय केंद्रातील सर्व पोलीसांना अधिकाऱ्यांना, विशेष करुन बाल कल्याण पोलीस अधिकारी म्हणून समाविष्ट केलेल्या, त्यांचे कर्तव्य योग्य रीतीने बजावण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाईल.
४) विशेष बाल पोलीस केंद्रात बालकांची प्रकरणे हाताळणारे लोहमार्ग (रेल्वे) पोलीसही असतील.