बाल न्याय अधिनियम २०१५
कलम १०५ :
बाल न्याय निधी :
१) राज्य सरकार, या अधिनियमान्वये कारवाई करण्यात येणाऱ्या बालकांच्या हितासाठी आणि पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या योग्य त्या निधीची तजवीज करील.
२) कोणत्याही व्यक्तीनी किंवा संस्थेनी दिलेल्या स्वयंस्फूर्त देणग्या, निधी किंवा जमा होणारी रक्कम वर नमूद निधीमध्ये जमा केली जाईल.
३) पोटकलम (१) प्रमाणे निर्माण केलेला निधी या अधिनियमाखालील प्रकरणे हाताळणाऱ्या राज्य सरकारच्या विभागाकडे सोपविलेला असेल व ठरवून दिलेल्या कामासाठी वापरला जाईल.