बाल न्याय अधिनियम २०१५
कलम १०४ :
समिती किंवा मंडळाला स्वत:च्या आदेशात फेरबदल करण्याचे अधिकार :
१) या अधिनियमात अपील किंवा पुनर्विलोकनाच्या नमूद केलेल्या क्रियारीतीला बाधा न आणता, समिती किंवा मंडळ, या संदर्भात प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने, स्वत: केलेल्या बालकाला कोणत्या संस्थेत पाठवायचे किंवा कोणत्या व्यक्तीच्या संगोपनात किंवा देखदेखीखाली बालकाला ठेवायचे याबाबतच्या आदेशात फेरबदल करु शकतील :
परंतु असे की, आदेशातील फेरबदलासाठी केलेल्या सुनावणीच्या दरम्यान, मंडळाचे किमान दोन सदस्य त्यामध्ये एक मुख्य दंडाधिकारी
असतील आणि समितीचे किमान तीन सदस्य आणि सर्व संबंधीत व्यक्ती किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी हजर असतील आणि सदर
आदेशात फेरबदल करण्यापूर्वी सर्वांना बाजू मांडण्याची संधी दिली जाईल.
२) समितीनी किंवा मंडळाने संमत केलेल्या आदेशातील लिपीकाच्या चुका किंवा अपघाताने किंवा नजरचुकीने झालेल्या चुका समिती किंवा मंडळाकडून कधीही स्वत: होऊन किंवा दाखल झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने दुरुस्त केल्या जातील.