बाल न्याय अधिनियम २०१५
कलम १०२ :
पुनर्विलोकन :
उच्च न्यायालय कोणत्याही वेळी स्वत: होऊन किंवा या संदर्भात दाखल झालेल्या अर्जावरुन, समिती किंवा मंडळाच्या किंवा बाल न्यायालयाने आदेश दिलेल्या कोणत्याही कारवाईचा अभिलेख सदर आदेशाची न्याय्यता किंवा योग्यता याबाबत आपले समाधान करुन घेण्यासाठी मागवू शकेल आणि त्या संदर्भात योग्य तो आदेश देऊ शकेल :
परंतु असे की, उच्च न्यायालय या कलमान्वये कोणत्याही व्यक्तीस त्यांची बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय प्रतिकूल आदेश देणार नाही.