माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ९० :
राज्य शासनाचे नियम करण्याचे अधिकार :
१) राज्य शासनास राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून या अधिनियमाच्या तरतुदी अमलात आणण्यासाठी नियम करता येईल.
२) विशेषत: आणि पूर्वगामी अधिकारांच्या सर्वसाधारणेस बाध न आणता अशा नियमात पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबीसाठी तरतूद करता येईल.
(a)क)(अ) कलम ६, पोटकलम (१) अन्वये फाईल करणे, काढणे, देणे किंवा प्रदान करणे या गोष्टी ज्यामध्ये अमलात आणल्या जातील त्या इलेक्ट्रॉनिक फॉर्मसाठी;
(b)ख)(ब) कलम ६, पोटकलम (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या बाबींसाठक्ष;
(c)१.(ग) (क) ***)
३) राज्य शासनाने या कलमान्वये केलेला प्रत्येक नियम करण्यात आल्यावर शक्य तितक्या लवकर, जिथे राज्य विधानमंडळाची दोन सभागृहे असतील तेथे त्याच्या प्रत्येक सभागृहासमोर किंवा जेथे एकच सभागृह असेल तेथे त्या सभागृहासमोर मांडण्यात येतील.
—–
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ४७ द्वारे गाळले.
