IT Act 2000 कलम ७० : संरक्षित यंत्रणा :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ७० :
संरक्षित यंत्रणा :
१.(१) समुचित सरकार शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, जी संगणक साधनसंपत्ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अतिमहत्त्वाच्या माहितीविषयक पायाभूत सुविधेवर परिणाम करणे अशी कोणतीही संगणक साधनसंपत्ती ही संरक्षित यंत्रणा असल्याचे घोषित करू शकेल.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनार्थ अति महत्त्वाची पायाभूत सुविधा याचा अर्थ, जिच्या असमर्थतेमुळे किंवा विनाशामुळे राष्ट्रीय सुरक्षा, अर्थव्यवस्था, सार्वजनिक आरोग्य किंवा सुरक्षा यांवर दुर्बलकारी परिणाम होतो अशी संगणक साधनसंपत्ती होय.)
२) समुचित सरकार, पोटकलम (१) अन्वये अधिसूचित केलेल्या संरक्षित यंत्रणेत ज्यांना प्रवेश करता येईल अशा व्यक्तींना लेखी आदेशाद्वारे प्राधिकृत करू शकेल.
३) जी कोणी व्यक्ती या कलमाच्या तरतुदींचे उल्लंघन करून संरक्षित यंत्रणेत प्रवेश मिळवील किंवा मिळविण्याचा प्रयत्न करील ती, दहा वर्षापर्यंत असू शकेल अशा कोणत्याही वर्णनाच्या कारावासास आणि द्रव्यदंडासही पात्र ठरेल.
२.(४) केंद्र सरकार, अशा संक्षिप्त यंत्रणेसाठी माहिती सुरक्षा कार्यपद्धती व प्रक्रिया विहित करील.)
——–
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ३५ द्वारे सुधारणा.
२.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ३५ द्वारे सुधारणा.

Leave a Reply