IT Act 2000 कलम १५ : १.(सुरक्षित इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम १५ :
१.(सुरक्षित इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर :
एखादी इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर ही जर –
(एक) सिग्नेचर करतेवेळी सिग्नेचर निर्माण करणारा डाटा, केवळ सही करणाऱ्या व्यक्तीच्याच, मात्र अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नव्हे नियंत्रणात असेल, तर आणि,
दोन) सिग्नेचर निर्माण करणारा डाटा, विहित करण्यात येईल अशी रीतीने साठविलेला व लावलेला असेल, तर सुरक्षित सिग्नेचर असल्याचे मानण्यात येईल.
स्पष्टीकरण :
डिजिटल सिग्नेचरच्या बाबतीत,सिग्नेचर निर्माण करणारा डाटा याचा अर्थ वर्गणीदाराजी खासगी की, असा आहे.
——-
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ११ द्वारे कलम १५ व कलम १६ सुधारणा.

Leave a Reply