माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
प्रकरण ५ :
इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आणि १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर) सुरक्षित करणे :
कलम १४ :
इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड सुरक्षित करणे :
जेव्हा एखाद्या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डला एका विनिर्दिष्ट वेळी सुरक्षा कार्यपद्धती लागू करण्यात आली असेल अशा बाबतीत, ते इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड अशा वेळेपासून ते पडताळणीच्या वेळेपर्यंत सुरक्षित इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड असल्याचे मानण्यात येईल.
———
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम २ द्वारे सुधारणा.
