माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
प्रकरण १२ :
१.(विशिष्ट प्रकरणी मध्यस्थ जबाबदार नसणे :
कलम ७९ :
विशिष्ट प्रकरणी जबाबदारीतून मध्यस्थास सूध देणे :
१) त्या-त्यावेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी परंतु, पोटकलम (२) व (३) ला अधीन राहून, मध्यस्थ त्याने उपलब्ध करून दिलेल्या किंवा ठेवलेल्या त्रयस्थ पक्षीय माहिती, डाटा किंवा संदेशवहन जोडणी यासाठी जबाबदार असणार नाही.
२) पोटकलम (१) च्या तरतुदी,-
(a)क)(अ) ज्यावरून त्रयस्थ पक्षाने उपलब्ध करून दिलेली माहिती पाठविली जाते किंवा तात्पुरती साठवली जाते किंवा ठेवली जाते त्या संदेशवहन यंत्रणेत प्रवेश मिळवून देण्यापुरतेच केवळ मध्यस्ताचे काम सीमित असेल, तर किंवा
(b)ख)(ब) मध्यस्थाने-
एक) पाठविण्यास सुरूवात केली नसेल तर,
दोन) पारेषणाच्या ग्राहकाची निवड केली नसेल तर; आणि
तीन) पारेषणामध्ये अंतर्भूत असलेली माहिती निवडलेली नसेल किंवा फेरफेर केली नसेल तर;
(c)ग)(क) मध्यस्थाने या अधिनियमाखालील त्याची कर्तव्ये पार पाडताना योग्य ती काळजी घेतली असेल आणि तसेच याबाबतीत केंद्र सरकार विहित करील अशा अन्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल असेल, तर लागू असतील.
३) पोटकलम (१) च्या तरतुदी,-
(a)क)(अ) मध्यस्थाने बेकायदेशीर कृती करताना, कट केला असेल किंवा चिथावणी दिली असेल किंवा मदत केली असेल किंवा प्रवृत्त केले-मग ते धाक दाखवून किंवा वचन देऊन किंवा अन्यप्रकारे असो,- असेल तर,
(b)ख)(ब) जर मध्यस्थाद्वारे नियंत्रित केलेल्या संगणक साधनात ठेवलेली किंवा त्याच्याशी संबंधित असलेली कोणतीही माहिती डाटा किंवा संदेशवहन जोडणी (qलक) यांचा वापर, बेकायदेशीर कृती करण्यासाठी करण्यात येत आहे याची प्रत्यक्ष माहिती मिळाल्यावर किंवा समुचित सरकारने किंवा त्याच्या एजन्सीने अधिसूचित केल्यावर देखील मध्यस्थाने कोणत्याही रीतीने पुरावा दूषित न करता त्या साधन सामग्रीवरील, ते साहित्य तातडीने काढून टाकल्यास किंवा त्यात प्रवेश करणे नि:समर्थ करण्यास कसूर केली तर लागू असणार नाही.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनार्थ, त्रयस्थ पक्षीय माहिती याचा अर्थ मध्यस्थाने त्याच्या मध्यस्थ म्हणून असलेल्या क्षमतेमध्ये देवाणघेवाण केलेली कोणतीही माहिती असा आहे. )
——-
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ४० द्वारे सुधारणा.