माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
प्रकरण १२क :
१.(इलेक्ट्रॉनिक पुरावा :
कलम ७९क(अ) :
केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक पुरावा परीक्षक अधिसूचित करणे :
केंद्र सरकार कोणत्याही न्यायालयासमोरील किंवा अन्य प्राधिकरणासमोरील इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पुराव्यावर तज्ज्ञ मत देण्याच्या प्रयोजनार्थ केंद्र सरकारच्या किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही विभागास, निकायास किंवा एजन्सीस विनिर्दिष्ट करू शकेल.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनार्थ, इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पुरावा याचा अर्थ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवलेला किंवा पाठविलेला शाबीत करण्यायोग्य मूल्य असलेली कोणतीही माहिती असा असून, त्यात संगणक पुरावा, डिजिटल ऑडिओ, डिजिटल व्हिडिओ, सेल फोन, डिजिटल फॅक्स मशिन यांचा समावेश होतो.)
——-
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ४० द्वारे सुधारणा.