माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ७३ :
विशिष्ट तपशील चुकीचा असलेले १.(डिजिटल सिग्नेचर) प्रमाणपत्र प्रसिद्ध करण्याबद्दल शास्ती :
१) कोणतीही व्यक्ती
(a)क)(अ) इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर प्रमाणपत्रामध्ये सूचीबद्ध केलेल्या प्रमाणन प्राधिकरणाने दिलेले नाही हे माहीत असलेले किंवा
(b)ख)(ब) इलेक्ट्रानिक सिग्नेचर प्रमाणपत्रामध्ये सूचीबद्ध केलेल्या वर्गणीदाराने स्वीकारले नसल्याचे माहीत असलेले किंवा
(c)ग) (क)रद्द केलेले किंवा निलंबित केलेले प्रमाणपत्र असल्याचे माहीत असलेले
कोणतेही १.(इलेक्ट्रॉनकि सिग्नेचर) प्रमाणपत्र हे अशा रद्द करण्यापूर्वी किंवा निलंबित करण्यापूर्वी निर्माण केलेल्या (इलेक्ट्रॉनिक सहीच्या प्रमाणपत्राच्या प्रयोजनासाठी प्रसिद्ध करण्यात येत असेल ते वगळून, प्रसिद्ध करणार नाही किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला ते उपलब्ध करून देणार नाही.
२) जी कोणतीही व्यक्ती, पोटकलम (१) च्या तरतुदीचे उल्लंघन करील तिला दोन वर्षापर्यंतच्या कारावासाची किंवा एक लाख रूपयांपर्यंतच्या दंडाची किंवा या दोन्ही शिक्षा होतील.
——–
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम २ द्वारे सुधारणा.