माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ७०क(अ) :
१.(राष्ट्रीय मध्यवर्ती (नोडल) एजन्सी :
१) केंद्र सरकार, शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे अतिमहत्त्वाच्या माहितीविषयक पायाभूत सुविधेचे संरक्षण करण्याच्या बाबतीत शासनाच्या कोणत्याही संघटनेस, राष्ट्रीय मध्यवर्ती एजन्सी म्हणून नामनिर्देशित करू शकेल.
२) पोटकलम (१) अन्वये नामनिर्देशित केलेली राष्ट्रीय मध्यवर्ती एजन्सी, अतिमहत्त्वाच्या माहितीविषयक पायाभूत सुविधेचे संरक्षण करण्याशी संबंधित असणारे संशोधन व विकास यासह सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यासाठी जबाबदार असेल.
३) पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेल्या एजन्सीची कामे व कर्तव्ये पार पाडण्याची रीत, विहित करण्यात येईल त्याप्रमाणे असेल.)
——–
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ३६ द्वारे दाखल.