माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ६ :
शासन आणि त्याच्या एजन्सींमध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आणि १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरचा) वापर :
१) कोणत्याही कायद्यात –
(a)क)अ) समुचित शासनाच्या मालकीच्या किंवा त्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही कार्यालयात, प्राधिकरणाकडे, मंडळाकडे किंवा एजन्सीकडे कोणतेही प्रपत्र, अर्ज किंवा इतर कोणतेही दस्तऐवज विशिष्ट रीतीने फाईल करण्यासाठी तरतूद करण्यात आली असेल;
(b)ख)ब) कोणतेही लायसेन्स, परमिट, मंजुरी किंवा मान्यता ती कोणत्याही नावाने संबोधण्यात येत असो ते विशिष्ट रीतीने देण्यात किंवा मंजूर करण्यात यावे यासाठी तरतूद करण्यात आली असेल;
(c)ग) क) पैसे स्वाकारणे किंवा देणे विशिष्ट रीतीने करण्यात यावे यासाठी तरतूद करण्यात आली असेल;
तर त्या वेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरीही, असे फाईल करणे, देणे, मंजूर करणे, स्वीकारणे किंवा प्रदान करणे हे जर समुचित शासनाने मंजूर केले असेल अशा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पार पाडण्यात आले असेल तर ते अशा आवश्यकता पूर्ण करतात असे
मानण्यात येईल.
२) पोटकलम (१) च्या प्रयोजनासाठी, समुचित शासनाला, नियमांद्वारे-
(a)क)अ) असे इलेक्ट्रॉनिक अभिलेख, ज्या रीतीने व स्वरूपात फाईल करता, निर्माण करता किंवा काढता येईल ती रीत किंवा नमुना;
(b)ख)ब) खंड (अ) अन्वये कोणतेही इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड फाईल करण्यासाठीची, निर्माण करण्यासाठीची किंवा देण्यासाठीची फी किंवा आकार यांच्या प्रदानाची रीत किंवा पद्धती, विहित करता येईल.
——-
१. २००९ चा अधिनियम क्रमांक १० याचे कलम २ द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट केले.