माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ६७ख(ब) :
कामवासना उद्दीपित करणारी कृती, इत्यादींमध्ये लहान मुलांचे चित्रण करणारे साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध केल्याबद्दल किंवा पाठविल्याबद्दल शिक्षा :
जी कोणी व्यक्ती,
(a)क)(अ) ज्यामध्ये कामवासना उद्दीपित करणाऱ्या कृतीमध्ये किंवा वर्तवणुकीमध्ये लहान मुलांचा समावेश असलेले चित्रण आहे असे कोणतेही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील साहित्य प्रसिद्ध करील किंवा पाठवील अथवा तसे करण्याची व्यवस्था करील; किंवा
(b)ख)(ब) अश्लील किंवा असभ्य किंवा कामवासना उद्दीपित होईल अशा रीतीने लहान किंवा डिजिटल प्रतिमा निर्माण करील, ते गोळा करील, त्याची मागणी करील, ते चाळील, त्याची जाहिरात करील, त्याचे प्रचालन करील, त्याची देवाणघेवाण करील किंवा वाटप करील; किंवा
(c)ग) (क) कामवासना उद्दीपित करण्यासाठी व त्याकरिता किंवा ज्या रीतीने संगणक साधनसामग्रीबाबत एखाद्या समजदार पौढ व्यक्तीच्या मनात क्षोभ निर्माण होईल अशा रीतीने, लहान मुलांचे एक किंवा अधिक लहान मुलांशी ऑनलाईन नातेसंबंध वाढीस लावी, त्यासाठी भुरळ पाडील किंवा त्यास प्रवृत्त करील; किंवा
(d)घ) (ड) लहान मुलांच्या ऑनलाईनचा दुरूपयोग करण्याची सुविधा करील; किंवा
(e)ङ)(इ) लहान मुलांशी केलेल्या कामवासना उद्दीपित करणाऱ्या कृतीशी संबंधित असणाऱ्या स्वत:च्या किंवा इतरांच्या दुवर्तनाचे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मुद्रित करील,
ती व्यक्ती पहिल्या अपराधासाठक्ष पाच वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही प्रकारच्या कारावासाच्या शिक्षेस आणि दहा लाख रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस आणि दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या अपराधासाठी, सात वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही प्रकारच्या कारावासाच्या शिक्षेस आणि तसेच दहा लाख रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस देखील पात्र असेल:
परंतु कलम ६७ च्या कलम ६७ अ च्या आणि या कलमाच्या तरतुदी, इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पुढीलपैकी कोणत्याही पुस्तकास, पत्रकास, कागदास, लेखास, चित्रास, रंगचित्रास, सादरीकरणास किंवा आकृतीस लागू असणार नाही.
एक) जे पुस्तक, पत्रक कागद, लेख, चित्र, रंगचित्र, सादरीकरण किंवा आकृती, विज्ञान, साहित्य, कला किंवा शिक्षण यांच्या हितार्थ किंवा सार्वजनिक आस्थेच्या अन्य उद्दिष्टार्थ आहे या कारणावरून ते जनतेच्या हिताचे असल्याचे समर्थन जे सिद्ध करील असे प्रकाशन; किंवा
दोन) जे सद्भावी वारसा जपण्यासाठी किंवा धार्मिक प्रयोजनार्थ, ठेवलेले आहे किंवा वापरलेले आहे.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनार्थ, लहान मुले याचा अर्त ज्या व्यक्तीने १८ वषे पूर्ण केलेले नाही अशी व्यक्ती होय.