IT Act 2000 कलम ६६च(फ) : सायबर दहशतवादासाठी शिक्षा :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ६६च(फ) :
सायबर दहशतवादासाठी शिक्षा :
१) जी कोणी व्यक्ती-
(A)क)(अ) भारताची एकता, एकात्मता, सुरक्षितता किंवा सार्वभौमत्व यास धोका निर्माण करण्याच्या अथवा लोकांमध्य किंवा लोकांच्या कोणत्याही गटामध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने,
एक) संगणक साधनसामग्रीत प्रवेश करण्याचा प्राधिकार असलेल्या कोणत्याही व्यक्तीस त्यात प्रवेश करण्यापासून वचित करण्याची व्यवस्था करील किंवा
दोन) प्राधिकार नसताना, संगणक साधनसामग्रीत न अंतर्भेद शिरकाव करण्याचा किंवा प्रवेश करील. किंवा प्रवेश करण्यास प्राधिकृत असलेल्या मर्यादेत वाढ किंवा प्रवेश करील.
तीन) कोणत्याही दूषित संगणकाची मांडणी करील किंवा मांडणी करण्याची तजबीज करील, ती व्यक्ती आणि अशा कृतीमुळे व्यक्तींचा मृत्यू घडून येई किंवा त्यांना इजा होईल किंवा मृत्यू किंवा इजा होण्याचा संभव असले अथवा समाजाच्या जीवितासाठी अत्यावश्यक असलेल्या वस्तू व सेवांचे नुकसान होण्याचा किंवा त्याच्या पुरवठ्यात व सेवेत अडथळा निर्माण होण्याचा किंवा कलम ७० अन्वये विनिर्दिष्ट केलेल्या अत्यंत महत्त्वाच्या माहितीच्या पायाभूत सुविधेवर प्रतिकूल स्वरूपाचा परिणाम होण्याचा संभव असेल याची जाणीव असताना कृती करील ती व्यक्ती,
(B)ख)(आ) जाणिवपूर्वकपणे किंवा उद्देशपूर्वकपणे प्राधिकार नसताना किंवा प्रवेश करण्यासाठी प्राधिकृत असलेल्या मर्यादेत वाढ करून संगणक साधनसामग्रीत शिरकाव करील किंवा प्रवेश करील, आणि अशा कृतीमुळे, राष्ट्राच्या सुरक्षेच्या किंवा परराष्ट्रीय संबंधाच्या कारणांसाठी निर्बंध असलेली माहिती, डाटा किंवा संगणक डाटाबेस मिळवील; किंवा अशा प्रकारे मिळविलेली अशी माहिती, डाटा किंवा डाटाबेस, भारताच्या सार्वभौमत्वाच्या व एकात्मतेच्या हितास, परराष्ट्राशी असलेल्या मित्रत्वाच्या संबंधास, भारताच्या सार्वभौमत्वाच्या व एकात्मतेच्या हितास, परराष्ट्राशी असलेल्या मित्रत्वाच्या संबंधास, सार्वजनिक सुव्यवस्थेस, प्रतिष्ठेस किंवा नीतिमत्तेस इजा करण्यासाठी अथवा न्यायालयाचा अवमान करण्याच्या, मानहानी करण्याच्या किंवा अपराधास चिथावणी देण्याच्या किंवा कोणत्याही परकीय राष्ट्राच्या, व्यक्ती गटाच्या किंवा अन्यथा फायद्यासाठी वापर शकेल किंवा वापरण्याचा संभव असेल असा विश्वास ठेवण्यास कारण असलेली कोणतीही निर्बंधित माहिती, डाटा किंवा डाटाबेस मिळवील.
ती कोणी व्यक्ती सायबर दहशतवादाचा अपराध करते.
२) जी कोणी व्यक्ती सायबर दहशतवाद करील किंवा करण्याचा कट करील ती व्यक्ती, आजीवन कारावासाच्या मर्यादेपर्यंत असू शकेल इतक्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल.

Leave a Reply